मनुष्याला मानव जन्म महत भाग्याने मिळालेला आहे.जन्माला आल्यानंतर हया ठिकाणी मनुष्याला सुख दुःख ,आशा निराशा,प्रतिकुल अनुकुल अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
मनुष्याला हा भवqसधु तरून जाण्यासाठी भगवंताच्या नामाचा अधार घावा लागतो. हा मायारूपी संसार तरून जाणे फारच कठिण कार्य आहे.परंतु भगवंतात्या नामाचा मनुष्याला जर आश्रय,आधार असेल तर तो निश्चित हा भवसागर सहजगत्या तरूण जाईल.जगत्गुरू तुकाराम महाराज नामाचा महिमा सांगतांना म्हणतात.
नामपरते साधन नाही पै आणिक। भवqसधुतारक हेचि एक।।
उत्तमा उत्तम सर्वाही वरिष्ट। नाम श्रेष्ठा श्रेष्ठ तिन्ही लोकी।।
तुकाराम महाराज आपल्या लाडक्या,जिव्हाळयाच्या भक्तांचे शुभ व्हावे म्हणून त्यांना वारंवार विनवणी करतांना म्हणतात की ,बाबा रे हा भवqसधु तरून जाणे अत्यंत दुस्कर असे कार्य आहे.परंतु भगवंताच्या नामाचा जर आधार असेल तर मनुष्य हा भवसागर सहज तरून जावू शकतो.तुकाराम महाराज म्हणतात की, नामाशिवाय उत्तम असे साधन नाही.नाम हे श्रेष्ठात श्रेष्ठ साधन आहे.
नाम हेच मुक्तीचे अमोघ साधन आहे.म्हणून ज्ञानी पुरूषाने नेहमी हया नामाचाच आधार घ्यावा.मनुष्याने आपल्या हृदयगाभाèयात सदैव भगवंताच्या नामाचे स्मरण,qचतन अखंड चालु ठेवावे .हे भगवंताचे नाम आत्मशांतीदायक ,आनंददायक त्याचप्रमाणे मुक्तीदायक सुध्दा आहे.भगवंताचे नाम हे जीवाचे शिवाशी एकरूप करण्याचे अमोघ ,अव्दितीय असे साधन आहे.
नामे पाषाण तरले।महापापी उध्दरले।।
एकनाथ महाराज नामाचा अगाध अलौकीक महिमा वर्णन करतांंना अतिशय आनंदाने भक्तांना सांगतात की ,नामाच्या आधारे निर्जीव पाषाण सुध्दा तरून जातात,तर आपण काय हा संसाररूपी सागर तरून जाणार नाही काय?महापापी राक्षस सुध्दा केवल नामाच्या साहयाने तरून जातात .एकनाथ महाराज म्हणतात की,भक्त प्रल्हाद हा वंशाने राक्षस होता परंतु प्रल्हादाने भगवंताच्या नामाचे अखंड स्मरण केले आणि भक्त प्रल्हादाचा उध्दार झाला.भगवंताच्या नामाचा महिमा अत्यंत प्रभाविपणे सांगतांना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात
नाम पवित्र आणि परिकरू।कल्पतरूहुनि उदारू।।
ते तु धरी कारे सधरू। तेणे तरसी भव दुस्तरू।।
संत श्रेष्ठ माऊली ही भक्तांच्या उध्दारासाठी त्याच्या कल्याणासाठी नेहमी तत्पर असते.भक्तांचा उध्दार व्हावा.त्याचे जीवन कारणी लागावे.त्याच्या जीवनामध्ये मुक्ती सहजगत्या त्याला मिळावी यासाठीच ते उपदेश करतांना नामाचा महिमा विषद करताना म्हणतात.नामाशिवाय जीवाला तरणोपाय नाही.
भगवंताच्या मधुर पावन अशा नामाने मनुष्य सबाहय शुध्द होतो.नाम हे मनाला ,आत्म्याला पवित्र करते.एकदा का भक्ताला भगवंताच्या नामची गोडी लागली की तो देहभान हारपून जातो.त्याला भगवंता शिवाय दुसरीकडे करमत सुध्दा नाही.त्याची अवस्था ‘आनंदाचे डोही आनंद तरंगङ्कहयाप्रमाणे होते नाम हे भक्तासाठी मायेप्रमाणे आहे नाम हे मनुष्याला कल्पतरूप्रमाणे त्यांच्या मनोच्छा पुर्ण करणारे आहे.
संतोष थोरहाते ,
विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो .9923209658
No comments:
Post a Comment